चेंबूर - शॉर्ट सर्किटमुळे चेंबूरच्या सिंधी कॉलनी परिसरात लिबर्टी शू मार्ट या चप्पल दुकानाला गुरुवारी आग लागली. नेहमीप्रमाणे दुकानात ग्राहक असतानाच सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान दुकानदाराने तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी अग्निशमनदलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेत दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय दुकान मुख्य रस्त्यापासून आत असल्याने अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.