आगीत रूम खाक

 Dahisar
आगीत रूम खाक

दहिसर - वीर संभाजीनगर परिसरात असलेल्या रेणुका माता चाळीतील एक रूम गुरुवारी लागलेल्या आगीत पूर्णत: खाक झाली आहे. या दुर्घटनेत घरात असलेली एक महिला आणि मुलगी थोडक्यात बचावले. रेणुका माता चाळीतील रूम नंबर 528मध्ये नीलेश बने आणि त्यांची पत्नी सुवर्णा तीन वर्षांच्या मुलीसोबत राहतात. गुरुवारी त्यांच्या घराला आग लागली. आग लागली तेव्हा सुवर्णा आणि तिची लहान मुलगी घरात होती. सुवर्णा तिच्या मुलीला घेऊन  त्या बाहेर पडल्याने बचावल्या.

Loading Comments