बेहरामपाडात पुन्हा भीषण आग

वांद्रे - मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात बुधवारी पहाटे नागरिक झोपलेले असताना भीषण आग लागली. पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 15 ते 20 झोपड्या जळून खाक झाल्यात. अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Loading Comments