• मुलुंडमध्ये  बसला आग
SHARE

मुलुंड - रेल्वे स्थानकाजवळच बसला आग लागण्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला. शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्थानकाजवळील आगारा नजीक हा प्रकार घडला. बस क्रमांक 402 मधील इंजिन गरम होऊन बसच्या पुढील बाजूस आग लागली.

दिवसभराचे कामकाज संपवून बस मुलुंड चेकनाका येथील मुख्य आगारात जात होती. त्यामुळे सुदैवाने बस रिकामी होती, अशी माहिती बसचे चालक संजय जाधव यांनी दिली. मुख्य आगाराकडे जाताना ही आग लागताच जाधव यांनी बस रस्त्यातच थांबवली. यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवली. लगेचच अग्निशमन दलाच्या एका बंबाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. बेस्ट बसचे काही नुकसान सोडता कोणतीही जीवित हानी झालेली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या