कुलाबा झोपडपट्टीत आग

 Kandiwali
कुलाबा झोपडपट्टीत आग

गणेशमूर्तीनगर - कफ परेड, कुलाबा येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, होमी भाभा पोलीस चौकी शेजारच्या गणेशमूर्तीनगरमधील दोन-तीन झोपड्यांना शनिवारी सकाळी आग लागली. मात्र, वेळीच लक्षात आल्यानं ही आग तातडीनं आटोक्यात आली. आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाडया घटनास्थळी रवाना झाल्या. सकाळी 11च्या सुमारास आग लागताच स्थानिकांनी घराबाहेर धाव घेतली. आग लागली त्या झोपडीचं बांधकाम कच्चं असल्यानं आग दोन-तीन झोपड्यांत पसरली. आगीमुळे सोना गुप्ता या 22 वर्षांच्या तरुणीला शॉक बसला. मात्र त्वरेनं उपचार करण्यात आल्यामुळे तिची प्रकृती स्थिर आहे. या आगीत कुलाबा पोलीस ठाण्यातले हवालदार नामदेव रोहावणे यांच्या दोन्ही हातांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यावर उपचार सुरू आहेत.

Loading Comments