अंधेरीत पेट्रोलपंपावर गोळीबार

बुधवारी पहाटे चार वाजता चकाला येथील गुरुनानक पेट्रोलपंपावर चेहऱ्यावर मास्क लावलेले दोघेजण दुचाकीवरून आले.

SHARE

अंधेरीतील चकाला येथे एका पेट्रोलपंपावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही. लूट करण्याच्या उद्देशाने दोघे दुचाकीवरून आले असल्याचं बोललं जात आहे. 

बुधवारी पहाटे चार वाजता चकाला येथील गुरुनानक पेट्रोलपंपावर चेहऱ्यावर मास्क लावलेले दोघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी येथील कर्मचाऱ्यांना बोलावून तुम्ही किती जण येथे आहात असं विचारलं. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय करायचे आहे असं विचारलं. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या तरूणाने बंदूक काढून त्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने गोळी झाडली.  कर्मचाऱ्यांनी तात्काळ पेट्रोलपंपावरील कार्यालयात धाव घेतली. 

 बंदुकीतील गोळी येथील एका टेबलाला लागली. कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे मास्क घातलेले हे दोघे पळून गेले. या गोळीबारात मात्र कोणाला इजा झाली नाही.  सीसीटीव्ही फुटेज आणि कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून अंधेरी पोलिस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. हेही वाचा  -

कुर्ल्यात ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

महिला पोलिसावर रेल्वे प्रवाशांचा हल्ला
संबंधित विषय
ताज्या बातम्या