२२ किलो गांजासह ५ जणांना अटक

'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत अंमली पदार्थांची आवक वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे.

२२ किलो गांजासह ५ जणांना अटक
SHARES

'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत अंमली पदार्थांची आवक वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बोरिवलीत ५ गांजा तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २२ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशमधून मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आला होता. दरम्यान, अंमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने अनयो सँडी (२७) या नायजेरियन तरुणाला सायन-पनवेल हायवे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चार लाखांचे एमडी ड्रग्ज सापडले आहे.

'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत अंमली पदार्थांची आवक वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. एसटीमधून उतरलेले पाच तरुण बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पदपणे फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ११ च्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दत्ता ठोंबरे (४०), अमर कांबळे (२६), रामू वाघमारे (६९), सुधाकर कदम (४०), अक्षय राठोड (२४) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगांमध्ये २२ किलो गांजा सापडला. हे पाचही जण चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. ते शेती आणि मजुरी करणारे आहेत.

महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाच्या सीमा भागातील जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांकडून हा गांजा खरेदी करून आणला असल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं. मुंबईत मागणी असल्याने गांजाची विक्री करण्यासाठी ते आले होते. ते नेमके कुणाला हा गांजा विकणार होते याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



हेही वाचा -

बेकायदा वाहतूक करणाऱ्या स्कूल बसविरोधात विशेष मोहीम

घरात गांजाची लागवड करणाऱ्याला अखेर अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा