डहाणूत महिलेची पाच लाखाची पर्स चोरीला

  Palghar
  डहाणूत महिलेची पाच लाखाची पर्स चोरीला
  मुंबई  -  

  चोरट्यांनी एका महिलेची पर्स पळवल्याची घटना पालघर जिल्ह्याच्या डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. त्या पर्समध्ये 5 लाख रुपए होते. महिलेने याची तक्रार डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सध्या पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला डहाणूत आपल्या कुटुंबियांसोबत राहाते. घटनेच्या दिवशी महिला आपल्या पतीसोबत कैनाड नाक्याजवळ असलेल्या एका फुग्याच्या कंपीनीत गेली होती. त्यावेळी महिलेने तिची पर्स एका मोटारसायकलवर ठेवली होती. तेवढ्यातच दोन जण तिथे आले आणि महिलेची पर्स पळवली. त्यानंतर महिलेने याची तक्रार पोलिसांत केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात कलम 379, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास करणारे पोलीस हवालदार वीएन मर्दे यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या चोरी झालेल्या पर्समध्ये एकूण 5,05,000 रुपये इतकी रक्कम होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.