जीएसटी अधिक्षकाला ब्लॅकमेल करत मागितली पाच लाखांच्या खंडणी


जीएसटी अधिक्षकाला ब्लॅकमेल करत मागितली पाच लाखांच्या खंडणी
SHARES

फेसबुवर महिलेसोबत झालेल्या मैत्रीनंतर तिने नग्न अवस्थेत वॉट्सअॅप कॉल करून त्याच्या चित्रीकरणाच्या सहाय्याने वस्तू व सेवा कर(जीएसटी) अधिक्षकाकडे पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी जीएसटी अधिक्षकाच्या तक्रारीनंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः- देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, राणेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत कपात

जीएसटी अधिक्षकाला काही दिवसांपूर्वी सोनिया नावाच्या महिलेने फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली होती. स्वीकारल्यानंतर या महिलेने अधूनमधून फेसबुक चॅटवर संदेश पाठवण्यास सुरूवात केली. अधिक्षकही तिच्यासोबत फेसबुकवरून बोलत होता. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये खासगी बोलणे सुरू झाले. सोनियाने या अधिक्षकाकडून मोबाईल क्रमांक घेतला. अधिका-यानेही तो दिल्यानंतर ८ जानेवारीला ते कार्यालयात जात असताना त्यांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. तो उचलल्यानंतर नग्न महिला व्हिडिओ कॉलवर उपस्थित होती. काही काळानंतर कॉल बंद झाल्यानंतर त्यांना एक दूरध्वनी आला त्यात तुझे नग्न महिलेसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना चित्रीकरण करण्यात आले असून तू पाच लाख रुपये दिने नाही, तर चित्रीकरण समाजमाध्यमांवर वायरल करून तुझी बदनामी करण्यात येईल, अशी धमकी या अधिक्षकाला देण्यात आले. खूपवेळ विचार केल्यानंतर तक्रारदाराने याप्रकरणी दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३८४ (खंडणी मागणे), ५०४(बदनामी करणे),५०६(धमकावणे) सह ६७(अं) (अश्लीलला पसरवणे) आदे विविध कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:- सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

अशाप्रकारे फेसबुकवर मैत्री करून नग्न व्हिडिओ कॉलद्वारे खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. बदनामीच्या भीतीने अनेकजण त्यांना परस्पर पैसे देतात. अनेकवेळा ही खंडणी आभासी चलनामध्ये(क्रीप्टोकरन्सी) मध्ये मागण्यात येते. त्यामुळे पैसे भरल्यानंतरही आरोपीचा माग काढणे कठीण होऊन बसले. त्यामुळे नागरीकांना अशा प्रकारांना बळी पडून नये, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा