वैदूगिरीच्या आड हत्यारांची तस्करी, पायधुनीत ७ बंदुका, ६७ काडतूस जप्त


वैदूगिरीच्या आड हत्यारांची तस्करी, पायधुनीत ७ बंदुका, ६७ काडतूस जप्त
SHARES

मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी शाखेने युनानी हकिमच्या वेषात हत्यारांची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अब्दुल सत्तार अब्दुल रेहमान शेख (३९) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५ बंदुकीसह ६७ काडतूस जप्त केली आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात शास्त्रसाठा जप्त झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या हकिमाचे अंडरवर्ल्डशी काही संबंध आहेत का ? याची शक्यता आम्ही पडताळून पहात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त दिलीप सावंत यांनी दिली.



पायधुनीतील एका हकिमाकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी पोलिसांनी शेखच्या अड्ड्यावर छापा टाकला असता मोठा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला. यांत २ पिस्तुल, २ देशी कट्टे आणि एका रिव्हॉल्व्हरचा समावेश आहे. त्याचबरोबर ६७ जिवंत काडतूस देखील खंडणी विरोधी पथकाने जप्त केली आहेत. सहा महिन्यांपूर्वी ही शस्त्रे बिहारमधून मुंबईत विकण्यासाठी आणल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला.

अब्दुल सत्तार अब्दुल रेहमान शेख हा एक युनानी हकीम असून पायधुणी परिसरात तो व्यवसाय करत आहे. मूळचा बिहारच्या दरभंगा येथे राहणारा अब्दुल सत्तार गेल्या १७ वर्षांपासून मुंबईत राहात आहे.



हे देखील वाचा - 

प्रेयसीसाठी लीक केला 'गेम ऑफ थ्रोन्स'?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा