5 तब्लिगीॆना धारावीतून ताब्यात घेतले


5 तब्लिगीॆना धारावीतून ताब्यात घेतले
SHARES
5 तब्लिगीॆना धारावीतून ताब्यात घेतले

देशात कोरोना सारख्या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना, दुसरीकडे दिल्लीतील तब्लीगी जमातीच्या कार्यक्रमला उपस्थित राहून, सरकारच्या आवाहानंतर ही पुढे न आलेल्या 150 तब्लीकींविरोधात मुंबई पोलिसांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माञ तरी ही 50 ते 60 तब्लीगींचा शोध घेण बाकी असून त्यांनी स्वत:हून पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन गृहमंञी अनिल देशमुख यांनी केलं आहे. दरम्यान 5 तब्लिकींना धारावी पोलिसांनी त्यांच्या परिसरातून ताब्यात घेतले आहे.



तब्लीगी जमातचे धार्मिक संमेलनात राज्यातून 1062 जण गेल्याचे निदर्शनास आले आहे. 13 ते 15 मार्चला दिल्लीतील निजामुद्दीन भागातील केंद्रात(मरकज म्हणजे केंद्र)  येथे हे संमेलन पार पडले. या संमेलनाला देशाच्या सर्वच राज्यांमधील व्यक्तींची उपस्थिती होती. डंप डाटानुसार पोलिसांनी त्यातील 890 जणांची ओळख पटवली.त्यातील 576 जणांना तातडीने विलगीकरण कक्षात हलवत त्यांची तपासणी केली असता. त्यातील 4 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागन झाली असून  यातील 2 अहमदनगर तर 2 पिंपरी चिंचवडचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यातील दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात मरकजला  सभागी झालेल्या 150 व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ त्यांचा शोध घेऊन त्यातील अनेकांना वेगळे करण्यात आले. पण देशात व राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सामुहिक कार्यक्रम करण्यास मनाई असतानाही मुंबईतील 150 व्यक्ती या तबलिगीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच त्याची माहिती लपवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी या 150 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  
 

माञ या 150 व्यतिरिक्त 50 ते 60 तब्लिगी नागरिकांचा मुंबई पोलिस शोध घेत आहेत. या नागरिकांचा डंप डेटाद्वारे मोबाइलनंबर मिळाला आहे. माञ त्यांनी फोन बंद केल्यामुळे त्यांना शोधणे पोलिसांना अवघड होऊन बसले आहे. या बेपत्ता तब्लीगींना तातडीने जवळील पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आवाहन गृहमंञी अनिल देशमुख यांनी केला आहे. तसे न केल्यास पोलिसांकडून कायदेशीर व कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा सज्जड दमच गृहमंञ्यांनी दिला आहे. दरम्यान 5 तब्लिगींना धारावी पोलिसांनी त्यांच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे. या तब्लिगींनी स्वत:ची ओळख आणि मोबाइल बंद ठेवून वास्तव्य करत असल्याचे कळते. धारावीसारख्या झोपडपट्टीत या तब्लिगींना शोधणे म्हणजे गवतातून सूई शोधण्यासारखे आहे. त्यामुळे तब्लिगींचा शोध घेणाऱ्या पथकांचे सर्वच स्तराहून कौतुक केले जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या तब्लिगींना तातडीने आरोग्यचाचणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या पाच जणांवर ओळख लपवल्या प्रकरणी गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा