ड्रोन उडवणाऱ्या तिघांना अटक

 Kandivali
ड्रोन उडवणाऱ्या तिघांना अटक

चारकोप - कांदिवलीतल्या चारकोप परिसरात बेकायदा ड्रोन उडवणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केलीय. विनापरवाना ड्रोन उडवल्याबद्दल क्राईम ब्रँच युनिट 11 ने राहुल जैयस्वाल, राणा सिंग आणि विधीचंद जैयस्वाल या तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन ड्रोन आणि एक आयपॅड जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सीसीटीव्ही कॅमेरे आणि चौकशीच्या माध्यमातून पोलिसांनी राहुल जैयस्वाल आणि राणा सिंग या दोघांना ताब्यात घेतलं. हे दोघे फिल्म शूटींगचं काम करतात. या वेळी या दोघांनी कबुली देत, चित्रपटाच्या शुटींगसाठी ड्रोन उडवल्याचं सांगितलं. तर त्यांच्या चौकशीत विधीचंद जैयस्वाल याचंही नाव समोर आल. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, ड्रोन त्याचे असून तो ते भाड्याने देत असल्याचं त्यानं सांगितलं.

Loading Comments