गतिमंद मुलीवर जबरदस्ती, सुरक्षा रक्षकाला अटक

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी आरोपी सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला

गतिमंद मुलीवर जबरदस्ती, सुरक्षा रक्षकाला अटक
SHARES

संधी साधून गंदीमंद मुलीला जबरदस्ती एका खोलीत नेहून तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र साळवे(३८) असे या आरोपीचे नाव आहे.  आरोपीला रंगेहाथ पकडल्यानंतर स्थानिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवालाच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणात अटक

चेंबूर परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहणारी २४ वर्षाची पीडित तरुणी गतीमंद आहे. शनिवारी मुलगी इमारतीखाली खेळण्यासाठी गेली होती. तेथून आरोपी सुरक्षा रक्षकाने तरूणीला तळ मजल्यावरील कोणीही राहत नसलेल्या खोलीत घेऊन गेला. त्याचवेळी इमारतीतील स्थानिक नागरीक सुरक्षा रक्षक राजेंद्र साळवे(३८) याचा शोध घेत होता. त्याच्या सहकारी सुरक्षा रक्षकाने तो तळमजल्यावरील एका खोलीत गेला असल्याचे सांगितले. त्याला शोधत तो स्थानिक नागरीक तेथे गेला. त्याने दरवाजा ठोठावला असता आतून कोणाताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ झाला, तरी आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानंतर अखेर काहीतरी गैरप्रकार झाला असल्याच्या संशयावरून इतर स्थानिकही तेथे जमा झाले. सुमारे २० मिनीटांनी दरवाजा उघडला असता आत पीडित तरूणी नको त्या अवस्थेत सापडली. तसेच आरोपीही त्याच खोलीत होता.

हेही वाचाः- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर

याबाबतची माहिती पीडित तरुणीच्या आईला दिल्यानतंर त्यांनी मुलीला विचारले असता तिने हातवारे करून तिच्याबद्दल आरोपीने केलेल्या अश्लील प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी स्थानिक चेंबूर पोलिस दाखल झाले. त्यांनी आरोपी साळवेला ताब्यात घेतले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी आरोपी सुरक्षा रक्षकाविरोधात भादंवि कलम ३५४, ३५४(ब), ३२३, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा