२ कोटींच्या ड्रग्जसह टांझानियाच्या महिलेस अटक, एक्सप्रेसमधून करत होती प्रवास

मूळची दक्षिण अफ्रिकेतील टांझानियाची असलेली सोगोरा मंगळवारी हिजारत निझामुद्दीन ते तिरवेंद्रमला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने प्रवास करत होती. एक्सप्रेसमध्ये तिच्या संशयित हालचालीवरून एकाने तिच्याजवळ एक संशयास्पद बॅग असल्याची माहिती आरपीएफला दिली.

२ कोटींच्या ड्रग्जसह टांझानियाच्या महिलेस अटक,  एक्सप्रेसमधून करत होती प्रवास
SHARES
मुंबईच्या नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबई रेल्वे प्रोटेकशन फोर्स (आरपीएफ) पोलिसांच्या मदतीने रेल्वेतून अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या महिलेस अटक केली आहे. सोगोरा ग्रासी अलीयास (२६) असं या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिच्याजवळून २ कोटी रुपयांचं १५ किलो एफेड्रीन ड्रग्ज हस्तगत केलं आहे. 

संशयीत हालचाली

मूळची दक्षिण अफ्रिकेतील टांझानियाची असलेली सोगोरा मंगळवारी हिजारत निझामुद्दीन ते तिरवेंद्रमला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने प्रवास करत होती. एक्सप्रेसमध्ये तिच्या संशयीत हालचालीवरून एकाने तिच्याजवळ एक संशयास्पद बॅग असल्याची माहिती आरपीएफला दिली. ती एक्सप्रेस पुढे जबलपूर स्थानकावर थांबणार असल्याचे कळाल्यानंतर आरपीएफ पोलिसांनी जबलपूर येथील आरपीएफ पोलिसांशी संपर्क करून तिचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आरपीएफचे अधिकारी एक्सप्रेसमध्ये त्या महिलेचा शोध घेत होते. त्याच वेळी तपास पथकाला ती एक्सप्रेसच्या बी-५ डब्यात ४१ नंबरच्या  सीटवर प्रवास करत असून तिच्याजवळ ड्रग्ज असल्याची माहिती मिळाली.  ती पनवेलला उतरणार होती.
 


पनवेल स्थानकात सापळा

आरपीएफ पोलिस तिला अटक करायला जाणार, तोच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिला अटक न करता तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे आरपीएफ पोलिसांनी एनसीबीला याची माहिती देत बोलावले. एक्सप्रेस पनवेलला पोहचणार त्या आधीच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिच्यासह साथीदारांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. सोगारा पनवेल येथे उतरून लोकलच्या दिशेने निघाल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ती पळून जाण्याआधीच तिला अटक केली. झडतीत पोलिसांना तिच्याजवळ १५ किलो एफेड्रीन ड्रग्ज आढळून आले. बाजारात त्या ड्रग्जची किंमत २ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी एनसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.हेही वाचा  -

'मॉब लिचिंग'चे गुन्हे धार्मिक तेढ, राजकीय स्वार्थासाठीच

२० कोटींच्या कोकेनसह ब्राझिलियन नागरिकाला अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा