SHARE

कुलाबा - परदेशी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी एका टॅक्सीचालकाला अटक केली आहे. जिया उल अन्सारी (30) असे या टॅक्सीचालकाचे नाव आहे. त्याची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

आॅस्ट्रेलियातून शिक्षणासाठी ही 20 वर्षीय विद्यार्थिनी मुंबईत आली आहे. स्टुडेण्ट व्हिसावर ती भारतात आली असून कुलाबातल्या हॉस्टेलमध्ये राहते. वरळीत राहणारा टॅक्सीचालक जिया अन्सारी याच्याशी 20 जानेवारीला कुलाबा येथे तिची ओळख झाली होती. अन्सारीने या विद्यार्थिनीला मुंबई दर्शनसाठी म्हणून आपल्या टॅक्सीत बसवले आणि संधी मिळताच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा विनयभंग केला.

पिडीत विद्यार्थिनीने अन्सारीच्या तावडीतून सुटल्यानंतर थेट कुलाबा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अन्सारी विरोधात तक्रार दाखल केली. कुलाबा पोलिसांनी अन्सारीचा शोध घेऊन त्याला वरळीतून अटक केली, अशी माहिती परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या