परदेशी नराधमाविरोधात बलात्काराचा गुन्हा

 Pali Hill
परदेशी नराधमाविरोधात बलात्काराचा गुन्हा

वांद्रे - सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना जाळ्यात ओढत लग्नाच्या भूलथापा देऊन त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या परदेशी भामट्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कॅरो हाफील याच्याविरोधात आतापर्यंत दोन तरुणींनी तक्रार नोंदवली असून या दोघींकडून पैसे घेऊन तो सिंगापूरला पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मूळचा सिंगापूराचा असलेला कॅरो काही महिन्यांपूर्वी भारतात आला होता. तो वांद्र्यातील चिंबईमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होता. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Loading Comments