अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत रवानगी

मनी लॉन्ड्रिग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत रवानगी
file photo
SHARES

मनी लॉन्ड्रिग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची रवानगी पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

तर सचिन वाझेनांही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अनिल देशमुखांनी घरचे जेवण मिळावे यासाठी न्यायालयात मागणी केली होती. मात्र न्यायालयानं त्यांच्या या मागणीला फेटाळून लावलं आहे. न्यायालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, तुम्ही अगोदर तुरुंगातील जेवण खाऊन पाहा. त्यानंतर जर तुम्हाला आवडले नाही तर आम्ही विचार करू, असं म्हणत न्यायालयाने देशमुखांना सुनावलं आहे.

जेवणासोबतच आरोग्याचे कारण देत त्यांनी तुरुंगात आरामासाठी बेड देण्यात यावा अशी मागणी केली होती. बेडसाठी न्यायालयाने मान्यता दिली आहे.

ईडीनं सचिन वाझेंसोबत समोरासमोर विचारपूस करण्यासाठी देशमुखांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. वाझे सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत असल्यानं दोघांची समोरासमोर विचारपूस करण्यात आलेली नाही.

या प्रकरणामध्ये अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपुर्द केला आहे. सीबीआयनं आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या जबाबावरून देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली २१ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरुद्ध सीबीआयनं एफआयआर दाखल केला. त्यानंतर ईडीनं देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध तपास सुरू केला होता.



हेही वाचा

मुंबईच्या NCB पथकाची मोठी कारवाई; १५०० किलो गांजा जप्त

परमबीर सिंह यांच्याविरोधात तिसरं अजामीनपात्र वॉरंट जारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा