मुंबईच्या NCB पथकाची मोठी कारवाई; १५०० किलो गांजा जप्त

मुंबई एनसीबी पथकानं १५०० किलो गांजा जप्त केला आहे.

मुंबईच्या NCB पथकाची मोठी कारवाई; १५०० किलो गांजा जप्त
SHARES

काही दिवसांपूर्वी श्रीनगरहून मुंबईत ड्रग्ज आणणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबई एनसीबी पथकानं १५०० किलो गांजा जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल इथं ही कारवाई करण्यात आली.

एनसीबीच्या पथकाला गुप्तहेराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ट्रकमधून नेला जाणारा गांजा पकडला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल १५०० किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून गांजाची पोती ताब्यात घेतली आहेत.

काही दिवसांपूर्वीच श्रीनगरमधून २४ किलो चरस आणून मुंबईला पुरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून पोलिसांनी २४ किलो चरस जप्त केला. ज्याची किंमत सुमारे १४ कोटी ४० हजार आहे. विशेष बाब म्हणजे ड्रग्जची ही खेप एका सेंट्रो कारमधून श्रीनगरहून मुंबईत आणण्यात आली होती. सर्व आरोपी हे पवईचे रहिवासी आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा