मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक

संजय पांडे 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक
SHARES

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज दिल्लीमध्ये अटक केली आहे. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली आहे. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला आहे. 

चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या प्रकरणात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

संजय पांडे यांनी 2001 मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलीस सेवेत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केले. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केली आहे.

संजय पांडे 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा