नायलॉनच्या मांजाची विक्री करणाऱ्या चार जणांना अटक

 Kurla
नायलॉनच्या मांजाची विक्री करणाऱ्या चार जणांना अटक

कुर्ला - नायलॉनच्या मांजाची विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी सोमवारी कुर्ल्यातून अटक केली आहे.
मकरसंक्रातीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याची परंपरा आहे. मात्र धारदार मांजामुळे गेल्या काही वर्षांत अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला. यामध्ये जनावरं आणि पक्ष्यांचाही बळी गेलाय. त्यामुळे अशा मांजावर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना कुर्ला परिसरातील दोन दुकानांमध्ये अशा प्रकारे मांजाची विक्री केली जात असल्याची माहिती प्राणी संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पेटा या सामाजिक संस्थेला मिळाली. त्यांनी नेहरूनगर पोलिसांच्या मदतीने याठिकाणी धाड टाकत शंभर किलो मांजा जप्त केला. यासह मांजाची विक्री करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल करत नेहरूनगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Loading Comments