निर्मात्याकडे २५ कोटींची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

तक्रारदार निर्मात्याच्या वडिलांना पार्किनसनचा आजार होता. त्यांना मसाज करण्यासाठी मसाज थेरपिस्ट म्हणून मिश्रा तक्रारदाराच्या घरी आली होती. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत ती निर्मात्याच्या घरी येऊन त्यांच्या वडिलांना मसाज देत होती.

निर्मात्याकडे २५ कोटींची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक
SHARES

नामांकित चित्रपट निर्मात्याकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. निर्मात्याच्या वडिलांची अश्लील चित्रफित सार्वजनिक करून बदनामी करण्याची हे चौघे धमकी देत होते. हुसेन मकरानी (३६), संकेतस्थळाचा प्रमुख युवराज चौहान (३२), रेहमान अब्दुल शेख (४५) व लकी मिश्रा (३२) अशी अारोपींची नावे आहेत.


मोर्फ चित्रफीत 

 ४० वर्षीय तक्रारदार निर्मात्याच्या वडिलांना पार्किनसनचा आजार होता. त्यांना मसाज करण्यासाठी मसाज थेरपिस्ट म्हणून मिश्रा तक्रारदाराच्या घरी आली होती. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत ती निर्मात्याच्या घरी येऊन त्यांच्या वडिलांना मसाज देत होती.  जानेवारी महिन्यात तक्रारदाराच्या वडिलांना खंडणीसाठी आरोपींकडून दूरध्वनी आला होता. त्यांनी आरोपींकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी आरोपींनी निर्मात्याला दूरध्वनी करून चित्रफीत पाहण्यासाठी बोलावले. त्यानुसार आरोपींनी निर्मात्याला पित्याची मोर्फ चित्रफीत दाखवली. ही चित्रफीत उघड न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. 


२६ फेब्रुवारीपर्यंत कोठडी 

 निर्मात्याने याप्रकरणी अंबोली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर अंधेरीतील लोखंडवाला परिसरात अंबोली पोलिसांनी सापळा रचून पाच लाखांचा पहिला हफ्ता स्वीकारताना आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले. आरोपींनी अशा पद्धतीने आणखी कोणाला ब्लॅकमेल केले आहे का याबाबत पोलिस तपास करत आहेत.



हेही वाचा - 

प्राध्यापकाविरोधात विद्यार्थिनीची विनयभंगाची तक्रार

कुरिअर बाॅयकडून महिलेवर जिवघेणा हल्ला; दादरमधील घटना




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा