'लष्कर ए तोयबा'कडून मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल उडवून देण्याची धमकी

पंचतारांकित हाॅटेल बाॅम्बने उडवून देणारा लष्कर-ए तोयबाच्या धमकीच्या ई-मेलनं एकच खळबळ

'लष्कर ए तोयबा'कडून मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल उडवून देण्याची धमकी
SHARES

मुंबई आणि मिरारोड येथील पंचतारांकित हाॅटेल बाॅम्बने उडवून देणारा लष्कर-ए तोयबाच्या धमकीच्या ई-मेलनं एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी बीडीडीएस पथकाच्या मदतीने सर्व हाॅटेलची तपासणी केली असता. तपासात पोलिसांना कोणतेही आक्षेपार्ह गोष्ठ आढळून आली नसल्याची माहिती पोलिस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली.

 मुंबईच्या अंधेरीतील लीला, प्रिन्सेस इन, पार्क व रमाडा या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल बुधवारी दुपारी चार ही हाॅटेलच्या मेलवर आला. हा मेल पाहताच हाॅटेल प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हालचाली सूरू केल्या, मुंबई बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाने श्वानपथक आणि यंत्रांच्या सहाय्याने  हाॅटेलचा संपूर्ण परिसरत तपासला मात्र कोणहिती आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे हाॅटेल प्रशासनाला हा ई-मेल नेमका कुणी पाठवला. त्याचे उदिष्ठ काय होते. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. 

तर दुसरीकडे मीरा-भाईंदर येथील पंचताराकिंत हाॅटेलच्या सेव्हन इलेव्हन क्लबच्या इमेल आयडीवर दहशतवाद्यांनी मेल करत पंचतारांकित हाॅटेल उडवण्याची धमकी दिली.कर्मचाऱ्याने इमेल पाहून मालक नरेंद्र मेहता यांना या संदर्भात माहिती दिली. नरेंद्र मेहता त्यांनी लागलीच पोलिसांना कळवले. ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हॉटेल संपूर्ण कारभार थांबवत झाडझडती सुरु केली. लष्कर-ए-तोयबाच्या नावाचा हा मेल आहे. त्या मेल मध्ये  १०० बीट कॉईन म्हणजे ७ कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. या संदर्भात मीरारोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

संबधीत ई-मेल हा इंग्रजी भाषेत आहे. क्लब वाचवायचा असेल तर, २४ तासांच्या आत ७ कोटी रुपये खात्यावर जमा करा, असंही मेलमध्ये म्हटलं आहे. २४ तासाच्या आता जर आम्हाला पैसे मिळाले नाही तर हॉटेलमधील ग्राहकांना बंदी बनवून सर्वांचा जीव घेऊ. जर घातपात झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असणार, आम्ही अल्लाह च्या नावाखाली मारायला तयार आहोत आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही, अशा प्रकारची धमकी या इमेल मध्ये देण्यात आली आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा