बनावट वेबसाईट बनवून राम मदिराच्या नावे लाखो रुपयांची लूट

बनावट वेबसाईट तयार करून राममंदिराच्या देणगीच्या नावाखाली रामभक्तांकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

बनावट वेबसाईट बनवून राम मदिराच्या नावे लाखो रुपयांची लूट
SHARES

बनावट वेबसाईट तयार करून राममंदिराच्या देणगीच्या नावाखाली रामभक्तांकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावानं बेकायदेशीर वेबसाईट तयार करण्यात आली. या वेबसाईटच्या सहाय्यानं पैसे उकळल्याप्रकरणी पाच जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

अवैध वेबसाईट सुरू करून लोकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे उकळणे सुरू असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई उत्तर प्रदेश पोलिसांनी केली. सोमवारी राम मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करणाऱ्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई नोएडा सायबर पोलीस ठाणे आणि लखनौ सायबर क्राईम मुख्यालयातील पथकांनी संयुक्तपणे केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावानं आरोपींनी वेबसाईट सुरू केली होती. ही वेबसाईट बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आली होती. राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक स्वरुपात योगदान देऊ इच्छिणाऱ्यांसाठी बँकेचा खाते क्रमांक देण्यात आला होता. त्याचबरोबर इतरही माहिती होती.

बोगस वेबसाईटच्या माध्यमातून आणि राम मंदिराच्या नावाखाली आरोपींनी देणगीदारांकडून लाखो रुपये उकळले. पाच जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची ओळख पटवण्यात आली आहे. आशिष गुप्ता (वय २१), नवीन कुमार सिंग (वय २६), सुमित कुमार (वय २२), अमित झा (वय २४) आणि सुरज गुप्ता (वय २२) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाच जणांपैकी तीन जण अमेठी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. तर दोघे बिहारमधील सीतामढी इथले आहेत. पाचही जण सध्या नोएडाला लागून असलेल्या पूर्व दिल्लीतील न्यू अशोक नगर परिसरात राहत होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून पाच मोबाईल जप्त केले. त्याचबरोबर एक लॅपटॉप आणि आधार कार्डच्या ५० प्रतीसह अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे.



हेही वाचा

राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेले १ कोटी गेले कुठे?- अनिल देसाई

Ram Mandir: राज्यातील सर्व राम मंदिर उघडा, भाजप नेत्याची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा