Advertisement

राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेले १ कोटी गेले कुठे?- अनिल देसाई

राम मंदिरासाठी शिवसेनेने १ कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली होती. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशीच १ कोटी रुपयांचा हा निधी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे जमा करण्यात आला होता.

राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेले १ कोटी गेले कुठे?- अनिल देसाई
SHARES

राम मंदिरासाठी शिवसेनेने १ कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली होती. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशीच १ कोटी रुपयांचा हा निधी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे जमा करण्यात आला होता. हा निधी मिळाला नसल्याचं ट्रस्ट सांगत असेल, तर हा निधी गेला कुठे? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे. (shiv sena donates 1 crore rupees for ram mandir says mp anil desai)

राम मंदिर निर्मितीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. येत्या ५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजनही ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला २०० मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.

हेही वाचा - Ram Mandir: राज्यातील सर्व राम मंदिर उघडा, भाजप नेत्याची मागणी

या भूमिपूजन कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. भूमिपूजन कार्यक्रम झाल्यानंतर राम मंदिराच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कार्यक्रमाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली. यावेळी शिवसेनेच्या १ कोटी रुपयांच्या देणगीबद्दल प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता, शिवसेनेकडून अजून एक रुपयाही आलेला नाही. मुरारी बापू देखील दान देणार होते; पण त्यांचीही देणगी अद्याप आलेली नाही. असं असलं, तरी मंदिर उभारणीच्या कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असं ते म्हणाले. 

यावर प्रतिक्रिया देताना अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला म्हणजेच २७ जुलै रोजी राम मंदिरसाठी शिवसेनेच्यावतीने १ कोटी रुपयांचा निधी राम मंदिर न्यासाच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात आला. निधी जमा केल्यानंतर न्यासाचे खजिनदार अनिल शर्मा आणि संपतराव यांच्याशी फोनवरून बोलणंही झालं. तेव्हा त्यांनी रक्कम जमा झाल्याचं सांगितलं. तरीही न्यासाचे अध्यक्ष गोपालराव देणगी मिळाली नसल्याचं सांगत असतील तर शिवसेनेने राम मंदिर उभारणीसाठी दिलेले १ कोटी रुपये कुठे गेले? असा प्रश्न अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाच्या उपस्थिती पाठोपाठ आता शिवसेना आणि न्यासात देणगीच्या रकमेवरूनही खडाजंगी होणार असल्याचं दिसून येत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा