परदेशी नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या भामट्याला अटक


परदेशी नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या भामट्याला अटक
SHARES

मुंबई -  नोकरीच आमिष दाखवून तरुणांना गंडा घालणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. वसीउल्ला कुरेशी आणि इझहार हुसेन इकबाल हुसेन अशी या दोघांची नावे असून दुबई, सौदी अरेबिया सारख्या गल्फ देशात नोकरीचं आमिष दाखवून या टोळीने तब्बल 89 तरुणांना चुना लावला आहे. अद्याप या दोघांचे तीन साथीदार फरार असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.

उच्चशिक्षित तरुणांना परदेशात चांगल्या नोकरीची संधी असल्याची जाहिरात काही महिन्यांपूर्वी इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्लेसमेंट एजन्सीच ऑफिस हे पवईला असल्याने कित्येक तरुण पवईला आले. यावेळी त्यांची कागदपत्रे तसेच प्रत्येकी 30 ते 40 हजार रुपये या ठकसेनने घेतले आणि लवकरच तुम्हाला नोकरीसाठी फोन येईल असं आश्वासन सगळ्यांना देण्यात आलं.

काही दिवसांतच सगळ्या उमेदवारांना फोन आले खरं पण यावेळी देखील प्रत्येकाकडून आणखीन पैसे घेत त्यांना एका विशिष्ट दिवशी कागदपत्रांसह ऑफिसला येण्यास सांगण्यात आले. पण जेव्हा हे उमेदवार ऑफिसला पोहोचले तेव्हा ऑफिसला टाळे असल्याचे त्यांना दिसले. त्यात सगळ्या एजंटचे फोन देखील बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तरुणांनी पवई आणि सहार पोलीस ठाण्यात या ठकसेनांविरुद्ध गुहे दाखल केले होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा