लाच मागितल्याप्रकरणी 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल


लाच मागितल्याप्रकरणी 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल
SHARES

मॅकनेली भारत इंजिनिअरिंग या कंपनीतील मूल्यवर्धित कर (व्हॅट) भरण्याच्या मदतीसाठी 2 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक राज्य कर आयुक्त सोपान रामभाऊ सूर्यवंशी आणि माजी विक्रीकर उपायुक्त डी. व्ही. रेठरेकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडून दाखल करण्यात आला आहे.

राज्य कर विभागाच्या पथकाने सप्टेंबर २०१६ मध्ये मॅकनेली भारत इंजिनिअरिंगच्या नागपूर येथील कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी कंपनीच्या २०११ ते २०१६ च्या व्हॅट परताव्यात दोष आढळल्यामुळे त्यांच्या कंपनीला ३ कोटी ५५ लाखांचा अतिरिक्त कर लावण्यात आला होता. अतिरिक्त कर लावल्यामुळे कंपनीचे सल्लागार डी. व्ही. रेठरेकर (माजी विक्रीकर उपायुक्त) यांनी कंपनीला हा कर भरण्याचा सल्ला दिला होता. डी. व्ही. रेठरेकर यांच्या सल्ल्यानुसार कंपनीने हा कर भरला.


म्हणून या दोघांवर गुन्हा

नोव्हेंबर २०१७ मध्ये कंपनीच्या उपाध्यक्षांकडे डी. व्ही. रेठरेकर यांच्यामार्फत सूर्यवंशी यांनी अन्वेषण विभागाच्या भेटीवेळी केलेल्या मदतीसाठी दोन कोटींची मागणी केली होती. त्यामुळेच या दोघांवर लाच मागितल्याचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडून दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडून देण्यात आली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा