उधारीचे पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राचीच केली हत्या

  Chembur
  उधारीचे पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राचीच केली हत्या
  मुंबई  -  

  उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने दोघांनी मित्राचीच गळा आवळून हत्या केल्याची घटना मंगळवारी चेंबूर कॉलनी परिसरात घडली. अमृतकुमार गौडा (35) असे मयत तरुणाचे नाव असून, तो रिक्षा चालक आहे. 

  चेंबूरच्या इंदिरानगर परिसरात मयत इसम त्याच्या दोन मित्रांसह एकाच भाड्याच्या खोलीत राहत होता. दरम्यान, अमृतकुमार याने यातील एका मित्राकडून काही दिवसांपूर्वी पैसे उसने घेतले होते. मात्र अनेकदा तगादा लावून देखील मयत इसमाने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे आरोपी आणि मयत इसमामध्ये अनेकदा वाद देखील झाले होते. 

  दरम्यान, मंगळवारी देखील याच कारणावरून या तिघांमध्ये भांडण झाले. आरोपींनी याच रागातून अमृतकुमार याची गळा अावळून हत्या केली. त्यानंतर यातील एक आरोपी पसार झाला आहे. तर दुसरा आरोपी पंकज मिश्रा (29) याला पोलिसांनी अटक केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.