मानखुर्दमध्ये शीतपेयातून गुंगीचे औषध देत, विवाहितेवर केला सामुहिक बलात्कार

वेदनांनी असह्य झालेल्या विवाहितेला शुद्ध आली तेव्हा ती रुग्णालयात दाखल होती. घडलेल्या प्रसंगामुळे पीडित महिलेला मानसिक धक्काबसला आहे.

मानखुर्दमध्ये शीतपेयातून गुंगीचे औषध देत, विवाहितेवर केला सामुहिक बलात्कार
SHARES

धारावी परिसरात राहणाऱ्या विवाहितेला नराधमांनी मुलाच्या वाढ दिवसाच्या पार्टीबोलावून तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर चौघांनी संधी साधून तिच्यावर आळीपाळीन बलात्कार केला. वेदनांनी असह्य झालेल्या या विवाहितेला शुद्ध आली तेव्हा ती रुग्णालयात दाखल  होती. घडलेल्या प्रसंगामुळे पीडित महिलेला मानसिक धक्काबसला आहे. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी मानखुर्द पोलिसात चार जणांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचाः- मुसळधार पावसामुळे मुंबईतील 'हे' रस्ते बंद

धारावी परिसरात राहणारी महिला ही सल्लागार म्हणून एका कंपनीत काम करते. तिची या चारही आरोपींना मागील ७ वर्षांपासून ओळखते.  अब्दुल जिलानी सत्तार शेख(३४), हैदर अली सरदार शेख ऊर्फ हिरा(३५), मुराद मेहबूब शेख उर्फ राज(२९) व मोहम्मद मुदाशीर नबी शेख उर्फ नबी उर्फ रहिम (३४) अशी या आरोपीची नाव आहेत. यातील रहिम हा मानखुर्द येथील रहिवासी असून उर्वतीत तिघे आरोपी माटुंगा लेबर कँप येथील रहिवासी आहेत.  पीडितेवरमागील अनेक दिवसांपासून या चारही आऱोपींची वाईट नजर होती अशातच जूनच्या शेवटच्या आठवड्यात अब्दुलने पीडितेला मुलाच्या वाढ दिवसाच्या पार्टीसाठी घरी बोलावले होते. त्यावेळी महिलेच्या नकळत चौघांनी पीडितेला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. पीडित मुहिला ही बेशुद्ध झाल्यानंतर या चौघा नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

हेही वाचाः- पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स

या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अब्दुल जिलानी सत्तार शेख(३४), हैदर अली सरदार शेख ऊर्फ हिरा(३५), मुराद मेहबूब शेख उर्फ राज(२९) व मोहम्मद मुदाशीर नबी शेख उर्फ नबी उर्फ रहिम (३४) या चौघांविरोधात ३७६(ड), ३२८ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. प्राथमिक वैद्यकीय अहवालात महिलेवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले असून तिच्या अंगावर नख मारल्याच्या जखमा आहेत. याप्रकरणी सर्व आरोपी 8 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. याप्रकरणी पोलिस पुरावे गोळा करत असून सीआरपीसी १६४ अंतर्गत महिलेचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा