२००२ खंडणीप्रकरण: अबू सालेमला ७ वर्षांचा तुरुंगवास


२००२ खंडणीप्रकरण: अबू सालेमला ७ वर्षांचा तुरुंगवास
SHARES

दिल्लीतील व्यावसायिकाकडून २००२ मध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर अबू सालेमला दिल्लीतील सत्र न्यायालयाने ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.


कुठली घटना?

१६ वर्षांपूर्वी म्हणजे एप्रिल २००२ मध्ये अबू सालेमने दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात राहणारा व्यावसायिक अशोक गुप्ता याला जीवे मारण्याची धमकी देत ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.


मे महिन्यात दोषी

याप्रकरणी अशोकने पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर २००४ मध्ये पुन्हा अबू सालेमने व्यापारी अशोक याला जीवे मारण्याची धमकी देत ५ कोटी रुपयांची मागणी केली. याप्रकरणी अबू सालेमला २७ मे रोजी २०१८ दोषी ठरवण्यात आलं होतं.


आणखी ७ वर्षे

अबू सालेम सध्या १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आणि १९९५ मध्ये बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे. २००२ मधील खंडणी प्रकरणाच्या निकालामुळे अबू सालेमला आणखी ७ वर्ष तुरुंगात राहावं लागणार आहे.



हेही वाचा-

कोरेगाव भीमा हिंसाचार : सुधीर ढवळेंसह तिघांना मुंबईतून अटक

चेंबूरमध्ये नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा