COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

कोरेगाव भीमा हिंसाचार : सुधीर ढवळेंसह तिघांना मुंबईतून अटक


कोरेगाव भीमा हिंसाचार : सुधीर ढवळेंसह तिघांना मुंबईतून अटक
SHARES

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळेसह तिन जणांना पुणे पोलिसांनी देवनारमधून बुधवारी सकाळी अटक केली. नक्षलवाद्यांशी असलेल्या संबधातून ही अटक केली असल्याचं कळते.


समर्थकांनी नोंदवला निषेध

सुधीर ढवळे हे एल्गार परिषदेचे आयोजक असून त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी गोवंडीतील देवनार पोलिस स्थानकाबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.


का झाली अटक?

कोरेगाव भीमा हिंसाचारपूर्वी प्रक्षोभक भाषणे करण्यात आली होती. सुधीर ढवळे यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे एल्गार परिषदेतही अशा प्रकारे चितावणीखोर भाषणे केली होती. पोलिस चौकशीदरम्यान हे सर्व ठरवूनच करण्यात आल्याचं पुढे आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुधीर ढवळे, वकील सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन यांच्या कार्यालयावर दोन महिन्यांपूर्वी छापे टाकले होते. या छापेमारीत पोलिसांना कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी काही महत्त्वाचे पुरावे मिळाले.

पोलिसांनी बुधवारी सकाळी सुधीर ढवळे यांना त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील घरातून पहाटे अटक करण्यात आली. त्याचबरोबर वकील सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


कोण आहेत सुरेंद्र आणि रोना?

नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलिंग हे नक्षलवाद्यांचे वकील म्हणून ओळखले जातात. नक्षलवाद्यांचे खटले ते लढवतात, ते देखील या हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या रडारवर होते. तर, दिल्लीतील नक्षलवादी चळवळीशी संबंधीत असलेल्या प्रा. साईबाबा यांची जागा चालवणारी नक्षलवादी समर्थक रोना विल्सन ही देखील आपल्या कार्यालयातून नक्षलवादी चळवळींशी संबधित कार्यक्रमात सहभागी किंवा आयोजकांची महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच पुणे पोलिसांनी रोनाला दिल्लीतून अटक केली आहे.


हेही वाचा - 

भीमा-कोरेगाव हिंसाचार: कबीर कला मंचच्या कार्यालयावर धाडी

एकबोटेंप्रमाणे भिडेंवर कारवाई का नाही?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा