भीमा-कोरेगाव हिंसाचार: कबीर कला मंचच्या कार्यालयावर धाडी

सकाळी ६ वाजेच्या सुमारास हे सर्व छापे टाकण्यात आल्याचं कळत आहे. पुण्यातील रमेश गायचोर, सागर गोरखेच्या वाकडमधील घरी पहाटे छापा टाकण्यात आला. नागपूरमध्ये अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी झडती घेण्याता आली. तर, मुंबईतील सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार यांच्या घरी सर्च वाॅरंट घेऊन पोलिस गेल्याची माहिती पोतदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

SHARE

भीमा-कोरेगाव इथं घडलेल्या हिंसाचाराच्या आधी पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद घेण्यात आली होती. या परिषदेत कबीर कला मंचाने सादर केलेल्या गीतांतून जनतेला चिथावल्याचा दावा करत पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यावरच न थांबता पोलिसांनी पुणे, नागपूर आणि मुंबईतील कबीर कलामंच आणि दलित पँथरच्या कार्यालवार छापे टाकले.

कुठे केलं कोम्बिंग आॅपरेशन

सकाळी ६ वाजेच्या सुमारास हे सर्व छापे टाकण्यात आल्याचं कळत आहे. पुण्यातील रमेश गायचोर, सागर गोरखेच्या वाकडमधील घरी पहाटे छापा टाकण्यात आला. नागपूरमध्ये अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी झडती घेण्याता आली. तर, मुंबईतील सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार यांच्या घरी सर्च वाॅरंट घेऊन पोलिस गेल्याची माहिती पोतदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

'वकिलांशी बोलू दिलं नाही'

पोलिस सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी सर्च वाॅरंट घेऊन आले होते. तपासणी करण्यापूर्वी त्यांनी घरातील सर्वांकडील मोबाइल फोन हिसाकवून घेतले. वकिलांशी देखील बोलू दिलं नाही. तपास करण्यापूर्वी पोलिसांकडून कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नव्हती. या पूर्वीही पोलिस विना वाॅरंट घरात सर्च करण्यासाठी आले होते. या दरम्यान पोलिसांनी घरातील वस्तू चोरल्याचा आरोप कबीर कला मंचच्या सांस्कृतीक सदस्य हर्षाली पोतदार यांनी केला.

पोलिसांनी केलेल्या या छापेमारीमुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटल्याचं दिसून येत आहे.हेही वाचा-

कोरेगाव-भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री

भीमा-कोरेगाव हिंसाचार: दडपशाहीचं कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबवा- प्रकाश आंबेडकर

भीमा-कोरेगाव हिंसाचाराला सरकारची स्पॉन्सरशीप?संबंधित विषय
ताज्या बातम्या