गँगस्टर रवी पुजारीकडून पुन्हा व्यावसायिकाला धमकी


गँगस्टर रवी पुजारीकडून पुन्हा व्यावसायिकाला धमकी
SHARES

गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला कुख्यात गुंड रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमकावण्यात आल्याचं समोर अालं अाहे. पैसे न दिल्यास कुटुंबासह व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आरे पोलीस ठाण्यात व्यावसायिकानं नोंदवली अाहे. हा गुन्हा अधिक तपासासाठी आता मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडं सोपवण्यात आला आहे.



गेल्या महिन्यापासून धमक्या

गोरेगावच्या मोहन गोखले रोड येथील अोबेराॅय एक्सक्युटिव्हमध्ये तक्रारदार व्यावसायिक मेहुल मेहता यांचा MDM REALTY बिल्डर अँड डेव्हलपर्स नावाने व्यवसाय अाहे. मेहुल यांची वांद्रे आणि मालाड येथे इमारतीच्या पुर्नविकासाची दोन कामं सध्या तेजीत सुरू आहेत. मेहुल यांचे कार्यालय अंधेरीत यशराज स्टुडिओजवळ पेनिन्सुला इमारतीत आहे. मे महिन्यापासून मेहुल यांना रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमकावले जात आहे.


जीवे मारण्याची धमकी

मेहुल हे वैद्यकीय तपासणीसाठी सिंगापूर इथं गेले असताना १८ मे रोजी पहिल्यांदा रवी पुजारीने त्यांना खंडणीसाठी फोन केला. त्यावेळी पाच कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र मेहुल यांनी त्याकडे दुर्लक्ष करत फोन कट केला. त्यानंतर पून्हा २९ मे रोजी मेहुल यांना एक फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने “तेरे को समझ में नही नही आता है! तेरे को १० जून तक टाइम देता हूँ. मुझे पाच करोड रुपये चाहिए, नही तो ठोक दूँगा. मै रवी पुजारी का आदमी हूँ” अशा शब्दांत त्यानं धमकावलं. पुजारी गँगचे हस्तक वेळोवेळी व्यावसायिकावर नजर ठेवून होते.


निनावी फोनने झोप उडवली

मेहुल यांनी घाबरून स्वतःच्या सुरक्षेसाठी एका बाॅडीगार्ड ठेवला. त्यानंतर पुन्हा ३१ मे रोजी आलेल्या निनावी फोनने त्यांची झोप उडवली. त्यावेळी समोरील व्यक्तीने “तेरे को समझ में नही आता क्या, तेरे को ठोक डालूंगा ! तू बाॅडीगार्ड लेके घूम रहा है! तेरे घरवालो के पास थोडी बाॅडीगार्ड है!” त्यानंतर 2 जून रोजी मध्यरात्री वारंवार फोन करून पुन्हा पैशांसाठी धमकावण्यात आले. अखेर घाबरलेल्या मेहुल यांनी आरे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा पुढे अधिक तपासासाठी खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला.


हेही वाचा -

गँगस्टर रवी पुजारीकडून विकासकाला धमकी, गुन्हे शाखा ८ कडे तपास

किर्ती व्यासच्या मृतदेहाचा शोध अद्यापही सुरूच

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा