गँगस्टर सोनू पठाणला अटक, मैत्रिणीला भेटायला येणं भोवलं

जानेवारीमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. हा कारखाना अंडरवर्ल्ड माफिया करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाण याच्याशी संबंधित होता.

गँगस्टर सोनू पठाणला अटक, मैत्रिणीला भेटायला येणं भोवलं
SHARES

मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या पठाण गॅंगचा म्होरक्या गँगस्टर सोनू पठाण याला अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने रविवारी मध्यरात्री सोनूला बेड्या ठोकल्या. मैत्रिणीला भेटायला आला असताना सोनू एनसीबीच्या जाळ्यात अडकला.

जानेवारीमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. हा कारखाना अंडरवर्ल्ड माफिया करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाण याच्याशी संबंधित होता. चिंकू पठाणला अटक करण्यात आली होती. चिंकूच्या चौकशीत सोनू पठाणचं नाव समोर आलं होतं. तेव्हापासून सोनू फरार झाला होता. एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते.

सोनू मध्यरात्री आपल्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची माहिती समीर वानखेडे यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात सापळा लावून त्याला गजाआड केले. सोनू पठाण हा अनेक प्रकरणात फरार आरोपी होता. त्याच्या विरोधात १० गुन्हे दाखल आहेत. यापैकी ७ गुन्हे मुंबई पोलिसात, तर ३ गुन्हे एनसीबीमध्ये दाखल आहेत.

जानेवारीमध्ये झालेल्या कारवाईत एनसीबीने ५.३७५ किलो मेफेड्रोन (एमडी), ६.१२६ किलो एफेड्रिन, ९९० ग्रॅम मेथाम्फॅटामिन, २ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि दोन शस्त्रे जप्त केली होती.



हेही वाचा-

विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

महापालिका 'यांच्या'साठी खरेदी करणार २४ नव्या गाड्या

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा