बंद घरात सिलेंडर फुटला

  Nala Sopara
  बंद घरात सिलेंडर फुटला
  मुंबई  -  

  नालासोपारामध्ये एका बंद घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा येथील नगीनदास पाडा येथील नाना बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर एका खोलीत गुरुवारी अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर खोलीत आग पसरली. 

  अचानक झालेल्या स्फोटाने इमारतीतील रहिवासी घाबरले आणि त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याला माहिती दिली. दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोहोचून त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत खोलीतील सामान जळून खाक झाले होते. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.