गॅंगस्टर अशोक मांढवेची आत्महत्या

 Mumbai
गॅंगस्टर अशोक मांढवेची आत्महत्या

कांजुरमार्ग - अरुण गवळी गॅंगच्या कांजुरमार्गमधील गॅंगस्टर अशोक मांढवे याने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केलीय. या घटनेनं गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. कांजुरमार्ग पोलिसांनी या घटनेची नोंद करून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. गवळी गॅंगच्या कांजुरमार्गमधील मोरक्या अशोक जोशीच्या टोळीतील मांढवे हा वाचलेला शेवटचा सदस्य होता. हनुमान गल्लीतील, मुरलीधर चाळीत लहानाचा मोठा झालेला मांढवे गेल्या ५ वर्षापासून पत्नी, दोन मुलांसोबत नेहरूनगरमध्ये राहत होता. गवळी गॅंगच्या जोशी याच्यासह पांड्या, परड्या, नाम्या, छोटा गुरू, मोठा गुरू यांना पोलिसांनी एनकाऊंटरमध्ये आणि टोळीयुद्धात खात्मा झाल्यानंतर मांढवे हा एकमेव बचावला होता. त्याच्या गर्भवती पत्नीने आम्ही सुधारतो असे सांगून पोलिसांकडे विनवणी केली होती. त्यानंतर मांढवे हा या परिसरात केबल आणि नेटचा व्यवसाय चालवत होता.

Loading Comments