भीषण अपघातात चिमुरडी ठार

 Ghatkopar
भीषण अपघातात चिमुरडी ठार
भीषण अपघातात चिमुरडी ठार
भीषण अपघातात चिमुरडी ठार
See all

गोवंडी - घाटकोपर मानखुर्द लिंकरोडवर मंगळवारी भीषण अपघात झाला. या अपघातात चिमुरडीला जीव गमवावा लागला. मानखुर्द लिंकरोड हायवेवरून मोटारसायकलने एक दाम्पत्य घाटकोपरच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या डम्परची मोटारसायकलला धडक बसली. या धडकेत महिलेच्या मांडीवर बसलेली चिमुरडी खाली पडली आणि डम्परच्या खाली आली. यात ती जागीच ठार झाली. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली असता पोलिसांनी या बघ्यांना हटवण्याच्या प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलीस आणि बघे यांच्यात बाचाबाची झाली. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करत गर्दी कमी करावी लागली. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी पादचारी पुलाची मागणी होतेय मात्र पादचारी पूल बनवण्याऐवजी गतिरोधक बनवण्यात आले. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या अपघाताची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित झालाय.

Loading Comments