अल्पवयीन मुलीची आत्महत्या

 Chembur
अल्पवयीन मुलीची आत्महत्या

 

सुभाषनगर - १७ वर्षीय तरुणीनं ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भांडुपमध्ये घडलीय. ज्योती भोसले असं या तरुणीचं नाव आहे. ज्योतीच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही.याप्रकरणी तिच्या कुटुंबियांसह मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदवण्यात येत असल्याचं भांडूप पोलिसांनी सांगितलं.

ज्योतीचं शुक्रवारी दुपारी तिच्या मोठ्या बहिणीसोबत भांडण झालं. याच रागात असलेल्या ज्योतीनं घरच्यांसोबत अबोला धरला. रात्री घरातील मंडळी बाहेर जाताच एकट्या असलेल्या ज्योतीनं ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केली. घरी परतल्यानंतर कुटुंबियांना ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबियांकडून याची माहीती मिळताच भांडूप पोलिसांनी तिला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र डाक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Loading Comments