भोंदूबाबाचा तरुणीवर बलात्कार


भोंदूबाबाचा तरुणीवर बलात्कार
SHARES

पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरातील एका भोंदूबाबाने जादूटोण्यात कालिका मातेला बळी देईन अशी धमकी देत एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्र्यंबकमुनी मंगलमुनी दास असं या नराधम भोंदूबाबाचं नाव असून, त्याला मदत करणाऱ्या 10 जाणांवर मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यात मोखाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मंगला चौधरी यांचेही नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्य आरोपी त्र्यंबकमुनी मंगलमुनी दास (बाबा) याने गेल्या तीन महिन्यांपासून तिला खोडाळा, खुडेद (जव्हार) आणि बलसाड (गुजरात) येथे नोकरीचे आमिष दाखवून तिचे शारिरीक शोषण केल्याचे पीडित तरुणीने बुधवारी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच बळजबरीने पळवून आपलं लग्नही लावण्यात आलं. त्यानंतर भिलाड स्टेशन जवळील बंद खोलीत उपाशी ठेवून तुझा कालिका मातेला बळी देईन अशी धमकी या नराधम बाबाने पीडितेला दिल्याची माहिती तिने पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणी पांडुरंग चौधरी, मंगला चौधरी, संदीप चौधरी, अलका बुधर, किरण भांबरे, मलिक शेख, मंगल लाखत, मोरे, संजय बुधर आणि चेतन दळवी यांच्यावर अपहरण करून तिचे लग्न लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा