सोन्याच्या बिस्किटांची शरीरात लपवून तस्करी, तिघांना अटक

 Mumbai Airport
सोन्याच्या बिस्किटांची शरीरात लपवून तस्करी, तिघांना अटक

मुंबई - मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या तिघांना कस्टम विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सलोचना केशवानी, मोहिनी लालवानी आणि आकाश मखिजानी अशी या तिघांची नावे आहेत.

बुधवारी रात्री कस्टम विभागाने बँकॉकवरून आलेल्या सलोचना केशवानी आणि मोहिनी लालवानी नावाच्या महिला प्रवाश्यांकडून ४५० ग्रॅम सोने जप्त केले. विशेष म्हणजे कस्टम विभागाची नजर चुकवण्यासाठी त्यांनी सोन्याची ही चार बिस्किटे आपल्या पार्श्वभागात लपवून ठेवली होती. 100 ग्रॅमची 4 सोन्याची बिस्किटे आणि 25-25 ग्रॅम सोन्याची दोन बिस्कीटे जप्त केली. याची बाजारात किंमत 13 लाख 65 हजार रुपये आहे.

दुसऱ्या एका कारवाईत कस्टम विभागाने आकाश मखिजानिकडून दोन सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे आकाशने 270 ग्रॅम वजनाची ही सोन्याची बिस्किटे आपल्या पार्श्वभागात लपवली होती. या सोन्याची एकूण किंमत सव्वा आठ लाख रुपये आहे.

Loading Comments