सोनं तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या इंजिनीअरला अटक


सोनं तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या इंजिनीअरला अटक
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता सोने तस्करीची आणखी एक घटना समोर आली आहे. मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने सोन्याच्या तस्करी प्रकरणी एअर इंडियाच्या इंजिनीअरला अटक केली आहे. जनार्दन कोंडवीलकर असे या इंजिनीअरचे नाव असून त्याच्याकडून ४४ लाख रुपये किमतीच्या सोन्याचे आठ बार जप्त करण्यात आले आहेत. जनार्दन कोंडवीलकर हा एअर इंडियाच्या सर्व्हिस इंजिनीअरिंग विभागात सिनीअर सुप्रिटेंडंट आहे.


४४ लाखांचे सोने जप्त

मंगळवारी रात्री ऐरोब्रीजवरून बाहेर पडताना हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनार्दन कोंडवीलकरांना अडवले, त्यांची झडती घेतली असता १६४९ ग्रॅम वजनाचे आठ सोन्याचे बार हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याची किंमत ४४ लाखांच्या घरात असल्याचा दावा हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.


आरोपीला अटक

या प्रकरणी जनार्दन कोंडवीलकरचा जबाब नोंदवण्यात आला असून त्याने सोने बाळगल्याचे कबूल केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी विमानतळाबाहेर ऊभ्या असलेल्या विजय रावळ नावाच्या रिसीव्हरला देखील हवाई गुप्तचर विभागाने अटक केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा