मुंबई विमानतळ की सोने तस्करीचा आड्डा!


मुंबई विमानतळ की सोने तस्करीचा आड्डा!
SHARES

मुंबई - मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात पकडल्या गेलेल्या सोन्याचा आकडा हा डोळे दिपवणारा आहे. गेल्या दोन दिवसात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 8 किलो 260 ग्रॅम सोने पकडले गेले आहे. या सोन्याची किंमत ही दोन कोटी तीस लाखांच्या घरात आहे.

22 जानेवारी 2016
दुबईवरून सोन्याची तस्करी करणाऱ्या इरफानभाई राणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 2 किलो सोने जप्त केले. पोर्टेबल कार आणि वॉशिंग मशीनमध्ये लपवण्यात आलेल्या या सोन्याची किंमत 54 लाख होती.

22 जानेवारी 2016
शारजावरून परतणाऱ्या रशीद मणिकोथ नावाच्य इसमाला कस्टमच्या अधिकाऱ्याने गुप्त माहितीद्वारे अटक केली. त्याच्या तपासणीत कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तब्बल एक किलो सोने जप्त केले. विशेष म्हणजे सोन्याचे हे दोन तुकडे इलेक्ट्रिक मिक्सरमध्ये अतिशय पद्धतशीरपणे लपवण्यात आले होते. या सोन्याची किंमत 27 लाख रुपयांहून अधिक आहे.

23 जानेवारी 2016
दुबईवरून आलेल्या अब्दुलसलीम मोहम्मद मलिकलकडून कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 13 सोन्याचे बार जप्त केले. 1624 ग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत 44 लाखांच्या घरात आहे. इलेक्ट्रिक मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हे सोन्याचे बार लपवण्यात आले होते.

सोन्याच्या तस्करीमध्ये आखाती देशातून आलेल्या प्रवाश्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सोन्याची तस्करी करणारी नवी टोळी सक्रिय झाल्याचा कस्टम विभागाला संशय आहे. सध्या त्याचाच तपास कस्टम विभाग करत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा