शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणारा अटकेत

 Mumbai
शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणारा अटकेत

गोवंडी - धारदार शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल, पैसे चोरणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. मोहम्मद शफी उर्फ शफी तुफानी असं या आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून मोबाईल आणि पाचशे रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. मोहम्मद शिवाजीनगर येथील भाजी मार्केटला आला आणि त्याने एका भाजीवालीला तलवारीचा धाक दाखवून 500 रुपये आणि मोबाईल हिसकावला. या आरोपीने अजून किती जणांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले याचा शोध पोलीस घेत आहेत.

Loading Comments