खेळण्यातल्या नोटा देत फसवणूक करणारे अटकेत

 Chembur
खेळण्यातल्या नोटा देत फसवणूक करणारे अटकेत

चेंबूर - भाजी विक्रेत्याला खेळण्यातल्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या तीन जणांना बुधवारी गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. चेंबूरच्या डायमंड उद्यान परिसरात ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. भाजी विक्रेत्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ आरडाओरडा केला. यातील एका आरोपीला रहिवाशांनी पकडून गोवंडी पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर त्याची झडती घेतली असता, लहान मुलांच्या खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार ते पाच दोन हजार रुपयांच्या नोटा त्याच्याजवळ आढळून आल्या. त्यानंतर चौकशी करुन पोलिसांनी त्याच्या आणखी दोन साथिदारांना अटक केली असून दारु पिण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.

Loading Comments