दिंडोशीतल्या मुलाच्या मृत्यूचे गुढ कायम


दिंडोशीतल्या मुलाच्या मृत्यूचे गुढ कायम
SHARES

दिंडोशीमध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय अनिल यादव या मुलाचा 30 जानेवारीला रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून ती हत्या आहे, असा संशय त्याचे आजोबा श्रीकृष्ण प्रसाद यादव यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे. ड्रग्जच्या विळख्याने आपल्या नातवाचा जीव घेतल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच दिंडोशी पोलीस आणि गुन्हे शाखेने याचा पर्दाफाश करावा अशी त्यांनी मागणी केली आहे.

'अनिल 30 जानेवारीला 7 वाजण्याच्या दरम्यान बिल्डिंगमध्ये सायकल चालवत होता. अचानक तो गायब झाला. आम्ही त्याला मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याने उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्ही हैराण झालो. दुसऱ्या दिवशी कांदीवली रुग्णालयातून आम्हाला माहिती मिळाली की त्याचा अपघात झालाअसुन त्यात तो मृत झाला आहे. दरम्यान श्रीकृष्ण प्रसाद यांनी आपल्या नातवाचा रेल्वे अपघातात कसा काय मृत्यू होऊ शकतो? तो रेल्वे ट्रॅकवर का जाईल? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. हे सगळं काहीतरी गौडबंगाल असल्याचं त्यांनी म्हणत पोलिसांनी याचा शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा