प्रवाशांचे चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाले

 wadala
प्रवाशांचे चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाले

हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरांना अटक करण्यात वडाळा लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. यासह चोरीला गेलेले लाखो रुपयांचे मोबाईल पोलिसांंनी तक्रारदार प्रवाशांना शुक्रवारी परत केले. हार्बर मार्गावरून प्रवास करतेवेळी प्रवाशांचे मोबाईल चोरीला जात असल्याच्या घटनांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून वाढ झाली होती. 

याविरोधात अनेक प्रवाशांनी वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता या चोरट्यांकडून तब्बल 7 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले. उर्वरित 8 मोबाईल ट्रेस करून मिळवण्यात आले आहेत. त्या सर्व मोबाईलची एकूण किंमत 1 लाख 57 हजार 747 रुपये इतकी आहे. या चोरट्यांविरोधात पोलिसांनी भादंवि कलम 379, 411 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. संबंधित तक्रारदारांची शहानिशा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले.

Loading Comments