सरकारची १२० कोटी रुपयांची फसवणूक, ३ व्यापाऱ्यांना अटक

बोगस कंपन्यांच्या साहाय्यानं केंद्र सरकारची फसवणूक करणाऱ्या तिघांना वस्तू व सेवा कर(जीएसटी) विभागानं अटक केली. संबंधितांनी या बोगस कंपन्यांमध्ये व्यवहार दाखवून १०० कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडीटचा दावा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सरकारची १२० कोटी रुपयांची फसवणूक, ३ व्यापाऱ्यांना अटक
SHARES

बोगस कंपन्यांच्या सहाय्यानं केंद्र सरकारची फसवणूक करणाऱ्या तिघांना वस्तू व सेवा कर(जीएसटी) विभागानं अटक केली. संबंधितांनी या बोगस कंपन्यांमध्ये व्यवहार दाखवून १०० कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडीटचा दावा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसंच, हा सर्व १२० कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याची शक्यता जीएसटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


खरेदी विक्रीचा व्यवहार

सरकारनं नोटबंदी पाठोपाठ विविध गोष्टींवर जीएसटी लावल्यामुळं मोठ्या व्यापाऱ्यांच कंबरडं मोडलं आहे. त्यामुळं व्यवसायातील कर वाचवण्यासाठी अनेक बड्या व्यापाऱ्यांनी बोगस कंपन्या उघडून त्याद्वारे खरेदी विक्रीचा व्यवहार दाखवत सरकारचा कर चुकवण्यास सुरूवात केली. या प्रकरणी राकेशकुमार जैन (४६), विपूर जैन (३९) आणि मनोजकुमार शर्मा (४९) यांनी सरकारची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं पुढे आलं आहे. यामधील राकेशकुमार जैन हा मुख्य आरोपी असून उर्वरीत दोघे त्याचे कर्मचारी आहे. जैन यानं या दोघांच्या नावावर बोगस कंपन्या तयार केल्या आहेत.


सात कंपन्यांचा वापर

या सर्व व्यवहारांसाठी सात कंपन्यांचा वापर करण्यात आला. त्या कंपन्यांनी एकमेकांसोबत धाग्याची खरेदी व विक्रीचा व्यवहार केल्याचं दाखवलं आहेत. याप्रकरणी जीएसटी अधिकाऱ्यांनी आरोपीच्या कंपन्यांमध्ये शोध मोहिम राबवली. त्यावेळी कर चुकवणाऱ्या या व्यापाऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार पुढे आला. सर्व व्यवहारांची कागदपत्रे सापडली. यावेळी चौकशी दरम्यान, त्याच्या माध्यमातून बँकेत कर्ज सुविधा अधिक कर्ज सुविधा मिळेल, या उद्देशानं कंपनीची पत वाढवण्यासाठी हे व्यवहार दाखवण्यात आले.हेही वाचा -

जळगावात उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते आपापसातच भिडलेRead this story in हिंदी or English
संबंधित विषय