इमारतीवरून पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

 Chembur
इमारतीवरून पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

चेंबूर - बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरुन पडून एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी चेंबूर परिसरात घडलीय. समरदास बंगाली (42) असं या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केलीय. पण त्याचा मृत्यू अपघाती नसून कोणी तरी ढकलून त्याला मारल्याचा आरोप त्याचा मोठा भाऊ प्रदीप बंगली यानं केलाय. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केलीय.

Loading Comments