SHARE

मुंबई - असं पहिल्यांदाच पाहायला मिळतंय की, मुंबई उच्च न्यायालयाने आरटीआय कार्यकर्त्यावर वसुलीच्या उद्देशाने चुकीची माहिती मागितल्याबद्दल दंडात्मक कारवाई केलीय. दंडाच्या स्वरुपात एक लाख रुपये टाटा कॅन्सर हॉस्पिटलध्ये एका आठवड्यात जमा करून त्याची माहिती न्यायालयास देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

वकील फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांनी सांगितलं की, त्यांचे अशील एमएम कॉर्पोरेशनकडून हेमंत दलाल, अशोक देशमुख, अश्विनी हिरानी आणि हिना श्रॉफ यांनी हफ्ता मागितला होता. तो न दिल्यानं या चौघांनी माहिती अधिकारांतर्गत फिर्यादीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर यातील टेम्पोचालक अशोक देशमुखनं मुंबई उच्च न्यायालयात बिल्डरविरोधात याचिका केली. दोन्ही बाजूंच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला हे आदेश दिले आहेत. यापैकी हेमंत दलालवर 31 खटले दाखल आहेत. तर अशोक देशमुखवर 13, अश्विनी हिरानीवर 5 खटले आणि हीना श्रॉफवरही 5 ते 6 फौजदारी खटले दाखल आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या