गोरेगावमध्ये कोसळलं हेलिकॉप्टर

गोरेगाव - गोरेगावच्या आरे परिसरात एक खाजगी हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. गोरेगावच्या फिल्टर पाडा भागातल्या जांभोरी मैदान परिसरात 12 वाजून 19 मिनिटांनी हे विमान कोसळलं. विमान कोसळताच त्यानं पेट घेतला. या वेळी स्थानिकांच्या मदतीनं तातडीने आग विझवण्याचं काम हाती घेण्यात आलं. दरम्यान या घटनेत हेलिकॉप्टरमधील 4 जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये दोन क्रू मेंबर्सचा समावेश असल्याचीही माहिती आहे. चौघांनाही उपचारासाठी सेव्हेन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Loading Comments