'सीबीआयचे डोके ठिकाणावर आहे का ?'

  Pali Hill
  'सीबीआयचे डोके ठिकाणावर आहे का ?'
  मुंबई  -  

  मुंबई - आदर्श घोटाळ्यातील बेनामी फ्लॅट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे. सीबीआयच्या रिपोर्टवर नाराजी व्यक्त करत सीबीआयला 2 महिन्यात पुन्हा तपास करून नव्याने रिपोर्ट सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याआधीही सीबीआईने दोनवेळा सादर केलेल्या रिपोर्टवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढत रिपोर्ट फाईल करताना सीबीआईचे डोक ठिकाणावर होते का? असा सवाल केला होता. अनेक नियम धाब्यावर बसवून बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटीत अनेक राजकीय नेते आणि बड्या सरकारी अधिका-यांनी फ्लॅट आपल्या नावावर केले आहेत. तसेच खेरीदीच्या अनेक व्यवहारात बेनामी संपत्ती वापरल्याचाही आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे. यावेळी हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआईचे सहसंचालक अमृत प्रसाद कोर्टात उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.